अमळनेर । शहरातील शाळा, महाविद्यालये, तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारी युवती, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी सोमवारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व पोलिसांच्या पथकाने स्वतः धडक मोहीम बजावली त्यात 16 जणांवर कारवाई केली आहे. धडक मोहीम हाती घेतल्याने शहरातील रोडरोमिओंची धाबे दणाणले आहे. अमळनेर शहरात निर्भया पथक नसल्याने चक्क रोडरोमिओंना कोणताही धाक राहिला नव्हता. सोमवारी पोलिसांचे पथक गावात जाऊन महाराणा प्रताप चौक, रेल्वेस्टेशन मंगलमूर्ती चौक भद्रा मॉल उड्डाणपूल अशा ठिकाणी जाऊन मुलींची छेडछाड करणार्यांचा समाचार घेत मोटार वाहन कायदायानंतर्गत तीन शीट, विनापरवाना कर्कश आवाजाचे हॉर्न विना नंबर प्लेट, 16 जणांवर धडक कारवाई केली आहे. प्रताप महाविद्यालयाचा रस्ता आणि उड्डाणपूल याच रस्त्यावर शाळाबाह्य टारगट मुलांचा उपद्रव वाढला आहे. महाविद्यालयातून परतणार्या शाळा सुटण्याच्या भरण्याच्या वेळी काही तरुण उभे राहून मुलींची छेड काढत असतात.यावर आता कडक कारवाई करणे सुरू केले असून क्लासेसच्या संचालकांना देखील पार्किंगची सूचना देत शिस्तीचे धडे देत रस्त्यावरील आईस्क्रीम गाडी,गोलागाडी, इतर हातगाडी चालकांना देखील टवाळ मुलांना जास्त वेळ उभे ठेवल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.