अमळनेर (सचिन चव्हाण)- शहरातील सिंधी कॉलनी भागात गुटख्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या आदेशावरून जळगाव पोलिसांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली तर स्थानिक पोलिसांनादेखील या कारवाईबाबत माहिती न कळवता झालेल्या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
लाखोंचा गुटखा जप्त
सिंधी कॉलनी, चोपडा रोडवरील श्याम वासवानी यांच्याकडे पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकत बंदी असलेला लाखो रुपयांचा विमल गुटखा जप्त करण्यात आला. जळगाव आरसीपीचे पथक या कारवाईत सहभागी झाले.
(सविस्तर थोड्यात वेळात)