अमळनेर । प्रयेक पाऊल विकासाच्या दृष्टीनेच पडत असते निवडणुकीनंतर विकासासाठी सर्वांनी राजकारण सोडून एकत्र आले पाहिजे, हे शहर विकासात्मक दृष्ट्या मागे असल्याने विकासाला गती देण्यासाठी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी एक पाऊल पुढे टाकत सत्तेच्या प्रवाहात आपल्या सोबत यावे, तसेच कर्तबगार व अभ्यासु नेते रामभाऊ संदानशिव यांच्यासारख्या व्यक्तीमत्त्वानेही येऊन जिल्हा व राज्यस्तरावर कार्यरत व्हावे, असे खुले निमंत्रण आमदार स्मिता वाघ यांनी दोन्ही नेत्यांना दिला. तर कृषीभुषण पाटील यांनीही एक दरवाजा बंद झाला असला तरी आमदार स्मिता वाघ रुपाने दुसरा दरवाजा उघडला आहे, असे मत व्यक्त करून एकप्रकारे धार्मिक संकेतही दिले.
गांधलीपुरा भागात कामांचा शुभारंभ
नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रभाग क्र 4 गांधलीपुरा भागात नागरी दलीत वस्ती योजनेंतर्गत रु. 1 कोटी 40 लाख निधीतून विकास कामांचा भव्य शुभारंभ व भूमीपूजन सोहळा डॉ. आंबेडकर उड्डाणपुलावर अतिशय थाटात पार पडला. यावेळी आमदार वाघ व कृषीभुषण पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचा विषय पुढे आल्याने मागील काळात झालेल्या चर्चेला पुन्हा दृष्टी मिळाली. सदर 1 कोटी 40 लाख निधीतून समाज मंदीर इमारत, मागासवर्गीय घटकांसाठी वाचनालय इमारत फरशी रोड भागात पेव्हर ब्लॉक बसविणे, मागासवर्गीय वसाहतीसाठी संरक्षक भिंत, तसेच महिलांसाठी सुलभ शौचालय बांधकाम होणार असल्याचे सांगितले.
शासनाच्या निधीचा चांगला विनीयोग
दलीत वस्तीसाठी न.पा.च्या इतिहासात प्रथमच एकावेळी 1 कोटी 40 लाखांचा निधी मिळाला असून याचे श्रेय रामभाऊ संदानशिव विनीयोग होत असल्याचे आज याठिकाणी चांगले चित्र दिसत आहे. अशी भावना कृषीभूषण पाटील यांनी बोलतांना व्यक्त केली. पुढे बोलतांना ते म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वाधिक सत्ताधार्यांकडून अमळनेरवर अन्याय होत आहे. आमदारांनी द्वेषबुद्धी ठेवत सत्तेचा वापर करून भुयारी गटार व विशेष रस्ता अनुदानाचा निधी दुसरीकडे वळवीला. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही अनुकुल काम करीत आहोत. सुर्देवाने आमदार स्मिताताईंच्या रूपाने दुसरा दरवाजा उघडला असल्याने आता चिंता नाही. विद्यमान आमदारांनी दिखाऊ कामे दाखवित दारू दुकानदारांचे अमिष आम्ही नाकारून हे रस्ते न.पा.हद्दीत घेतले नाहीत. असे सांगून पोलिसांनी दारूबंदी कारवाईत सातत्य ठेवावे अशी मागणी त्यांनी केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी मंचावर उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, नगरसेवक प्रविण पाटील, रामभाऊ संदानशिव, संजय पाटील, निशांत अग्रवाल, विवेक पाटील, दिपक पाटील, संजय पवार, विक्रांत पाटील, शेखा मिस्तरी, नरेंद्र सदानशिव, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.एम. पाटील, डॉ.विलास महाजन, लालचंद सैनानी, फयाज, संतोष कलोसे, आदी मान्यवरांसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचा सत्कार नगरसेवक नरेंद्र संदानशिव तर आभार प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी मानले. यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरींकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.