अमळनेर । येथील गुलमोहर कॉलनीतील रहिवासी प्रज्ञा निलेश साळुंखे 36 यांनी 17 रोजी राहत्या घरी नैराश्यातून स्वतःला पेटवून आत्महत्या केल्याची घटना 4 वाजेच्या सुमारास घडली. प्रज्ञा यांचे पती निलेश साळुंखे मारवाड येथे शिक्षक असून ते रावेर येथे लग्नाला गेले होते तर त्यांचे सासू सासरे डोळ्यांच्या शश्रक्रियेसाठी बदलापूर येथे गेले होते तर मुलगी स्वानंदी ही मामाच्या गावाला शेंदूर्णी येथे गेलेली होती.
दुपारी 4 वाजता चिठ्ठी लिहिली त्यात प्रिय निलेश, मी प्रचंड नैराश्यात अडकून हे कृत्य करीत आहे. यास कोणीही जबाबदार नाही माझ्या सानू बाळाला गोड पापा तिची आईसारखी काळजी घ्या, तुमचीच प्रज्ञा, असे लिहिले होते त्यानंतर स्वतःला जाळून घेतले शेजार्यांना घरातून धूर निघत असल्याचे दिसल्यानंतर पळापळ झाली. पुढच्या दाराला आतून कडी लावलेली असल्याने मागून दार उघडले असताना प्रज्ञा मरून पडलेली होती. तिचे प्रेत जळत होते जमलेल्या लोकांनी पाणी टाकून विझवली नंतर पोलिसांना बोलावून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पीएसआय देविदास बिर्हाडे व पोलिस कॉन्स्टेबल सुनील हटकर यांनी पंचनामा केला.