खंडित वीजपुरवठ्याने संताप ; तीव्र आंदोलनाचा इशारा
अमळनेर- पवित्र रमजान महिन्यात नमाज तथा धार्मिक विधी उपवास होत असतांना मुस्लिम बहुल भागात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या शहाआलम नगर, कसाली,अंदर पुरा, बाहेर पुरा, ताडेपुरा, इस्लामपुरा भागातील मुस्लिम बांधवांनी वीज महावितरण कंपनी चे सहाययक अभियंता शहर कक्ष 2 निलेश कुरसुंगे यांच्या खुर्चीला हार टाकून केले आंदोलन. या बाबत कुरसुंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळेे वीजपुरवठा खंडित होत आहे. सध्या युद्ध पातळीवर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या आंदोलनाच्या वेळेस नावीद शेख, अहमद सैयद, आरीफ शेख, अस्लम पठाण,अर्षद खाटीक,मझहर पठाण इत्यादी मुस्लिम बांधव उपस्थित होते.