अमळनेरात शासकीय विश्रामगृहाला आग

0

अमळनेर । येथील ठेकू रोड वरील शासकीय विश्रामगृहास मंगळवारी 25 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली या आगीत इमारतीचे मोठया प्रमानावर नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मोठी वित्तहानी झाली असून अंदाजित सुमारे 2 ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे . रस्त्यावरील युवकांना इमारतीतून धूर निघत असल्याचे दिसतात त्यांनी शाहनिशा केल्यावर आग लागल्याचे दिसल्याने त्यांनी बाजूच्या कार्यालयात सांगितले तोपर्यंत आग हवेमुळे वाढली होती. अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमनच्या दोन गाड्या पोहचेपर्यंत अर्धे कार्यालय जळाले होते दोघे गड्ड्यांनी 30 ते 40 मिनिटात आग आटोक्यात आणली तो पर्यंत मात्र इमारतीचे बरेच नुकसान झाले होते. या आगीत विश्राम गृहातील कॉट, गाद्या, दरवाजे, खिडक्या, कुलर खुर्च्या, टेबल, फॅन, फ्रीज यांच्यासह दरवाजाच्या चौकट व इतर बर्‍याच वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यावेळी अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील फारुख शेख, रविंद्र मराठे, दिनेश बिर्‍हाडेे, वसीम पठाण, भिका संदानशिव या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली.