अमळनेरात शिष्यवृत्तीच्या प्रश्‍नपत्रिकांमध्ये घोळ

0

अमळनेर । तालुक्यातील मंगरूळ येथील सेन्ट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) परिक्षा शहरातील साने गुरूजी विद्यालयात घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना इंग्लिश मेडीयमच्या प्रश्‍नपत्रिकांऐवजी सेमी इंग्लिशच्या प्रश्‍नपत्रिका वाटप करण्यात आल्या. त्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थी व पालकांची एकच गोंधळ निर्माण झाला. संबंधित केंद्र संचालकांना याबाबत विचारणा केली असता, संबंधित शाळेतील लिपीकांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरतांना सेमी इंग्लिश मिडीयममध्ये भरण्या असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर पालकांनी रोष व्यक्त करत शाळेचे प्राचार्यांना याबाबत माहिती देवून परिक्षा केंद्रावर येण्याची विनंती केली मात्र त्यांनी त्याठिकाणी येण्यास असमर्थता दाखविली आहे.

गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले निवेदन
विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत पालकांनी अमळनेरच्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडे निवेदन दिले आहे. या निवेदनावर पालक किरण शिसोदे, चंद्रशेखर पाटील, किरण नवल पाटील, चंद्रकांत दौलत वाघ, भटू विश्‍वासराव पाटील, लक्ष्मण नथ्थू पाटील, देविदास सिताराम महाले यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. दरम्यान जळगाव जिल्ह्यात आज ठिकठिकाणी आज झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या काही ठिकाणी असाच प्रकार झाल्याचे बोलले जात आहे.

”पालकांनी दिलेल्या निवेदनाच्या मागणी नुसार मंगरूळच्या सेन्ट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूल व्यवस्थापन विभागाची चौकशी करू, चौकशीत दोषी आढळल्यास तसा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल.”
– अशोक बिर्‍हाडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, अमळनेर