अमळनेर । येथील संभाजी ब्रिगेड पक्षाने नुकतेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार, असल्याचे माहिती तालुकाध्यक्ष प्रशांत भदाने यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तालुक्यातीलसर्वच जागा पक्ष स्वबळावर लढनार असल्याचे सांगितले. जिल्हा परीषदेसाठी 6 तर पंचायत समितीसाठी 13 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या माजीआमदारसाहेबराव पाटील हे पाडळसरे धरणावर जलसत्याग्रह करणार आहेत. त्या आंदोलनास पक्ष फक्त शेतकरी हितासाठी पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मनोहर पाटील आदी उपस्थित होते.