अमळनेरात सकल मराठा समाजातर्फे कै काकासाहेब शिंदें यांना श्रद्धांजली

0

शांततेत मोर्चा; शोकसभेचे आयोजन
अमळनेर । अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहयाच्या आवारात सकल मराठा समाजातर्फे कै.काकासाहेब शिंदें यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सरकारचा निषेध म्हणुन मराठा समाजातील बांधवांनी स्वतःचे मुंडन करून या बलिदान देण्यार्‍या मराठा बांधवांचे सुतक पाळले आहे. या निषेधाच्या वेळी सरकारविरोधी विवीध घोषणा देण्यात आल्या या निषेधार्थ हजारो तरुण शाळेचे महाविद्यालयातील विद्यार्थी विविध संघटनांचे पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते. या ठीकाणी मुंडण केल्यानंतर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात मोर्चात सरकारचा निषेध म्हणून घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे अशी मागणी करण्यात आली. त्यानतंर जिल्हा परिषदेच्या विश्राम गृह येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेत काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, असे आवाहन देखील करण्यात आले.

अनेक संघटनांनी दिला पाठिंबा
मराठा समाजातील तरूणांनी असा जीव न गमावता संघर्ष करायचा या शोकसभेच्या वेळी अमळनेर येथील सुन्नी दारूल कजाच्या वतीने या मोर्चाला व मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला. तसे पत्र या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी दिले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल भाईदास पाटील काँग्रेसच्या नेत्या ललिता पाटिल, उमविचे माजी कुलगुरु शिवाजीराव पाटिल, संभाजी ब्रिगेडचे अनंत निकम, नगरसेवक शाम पाटिल, कृउबाचे संचालक सचिन पाटिल, सामाजिक कार्यकर्ते राजेन्द्र यादव, संदीप घोरपडे, भरत पवार तसेच हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभाग होता.