अमळनेरात साई लॉजिंगवर धाड : लॉज मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा

0
अमळनेर-  शहरातील धुळे रोड वरील साई लॉजिंगवर धाड टाकून पोलिसांनी दोन महिलांसह लॉज मॅनेजरसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. लॉजमध्ये अनैतिकरीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून शनिवारी धाड टाकण्यात आली. हॉटेल साई लॉजचे मॅनेजर अंकुश दौलत पाटील (मंगरूळ) व दिलीप टिटुमल ललवाणी (न्यू प्लॉट, अमळनेर) यांना अटक करण्यात येवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दोन महिलांना ताब्यात घेवून त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख, मनोहर देशमुख, नीळकंठ पाटील, विजय पाटील, रवी गायकवाड, रामचंद्र बोरसे, नरेंद्र वारूळे, मिलिंद सोनवणे, रमेश चौधरी, सविता परदेशी, वैशाली पाटील, गायत्री सोनवणे, वहिदा तडवी,  चालक मुरलीधर बारी, दर्शन ढाकणे आदींनी ही कारवाई केली.