अमळनेर : अमळनेर शहरातील भोईवाडा परीसरातील एका दारूच्या गुत्यावर एक जण स्पिरीट व रसायन मिश्रीत दारूची विक्री होत असताना अमळनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पथकाने बुधवार, 27 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत 150 लिटर स्पिरीट व रसायन मिश्रीत दारू जप्त करण्यात आल्यानंतर नष्ट करण्यात आली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी विशाल दशरथ चौधरी (भोईवाडा, अमळनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.