अमळनेर । हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी नगरपालिकेने कायद्याचा बडगा उचलला असून उघड्यावर बसणार्या 19 जणांवर पोलीस कारवाई तर 3 आरोग्य निरीक्षकांना करणे दाखवा नोटीस दिल्या आहेत. स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत मार्च अखेर पर्यंत न पा ला अल्टीमेंटम दिला आहे गांधीगिरी करूनही नागरिकांनी उघड्यावर शौचास बसने बंद केलेले नाही तसेच अनुदान देऊनही शौचालय बांधत नाहीत म्हणून मुख्याधिकारी पी.जी सोनवणे यांनी आरोग्य कर्मचार्यांनी पोलिसांना घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान माणुसकी पोटी कर्मचार्यांनी काही नागरिकांवर गुन्हे दाखल न केल्यामुळे आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिर्हाडे, अरविंद कदम यांना तुमच्यावर निलांबनाची कारवाई का करण्यात येऊ नये म्हणून मुख्याधिकारी पी जि सोनवणे यांनी कारणे दाखवा नोटीस दिल्या असून सात दिवसात खुलासा मागवला आहे.
यांच्यावर झाली कारवाई
सकाळी चार वाजेपासून टाकलेल्या छाप्यात गंधलीपुरा चुनघानी परिसरातील नरेश साळुंखे, छगन चव्हाण, पैलाड भागातील शुभम पाटील, किरण भोई, एकनाथ पाटील, सागर पवार, कमलाकर पाटील, हरी पाटील, लोटन लोहार, मच्छीन्द्र पाटील, मधुकर पाटील, गोविंदा ईशी, फकिरवाडा येथील इरफान कुरेशी, जावेद शेख हुसेन, राहिमशा नबाब शा, तुकाराम भिवसन पाटील, आदींना पोलिसांनी व नगरपालिका कर्मचार्यांनी रंगेहाथ पकडून कारवाई करण्यात आली.