अमळनेर – शहरातील मंगलमूर्तीचौकात सायंकाळी 7.45 वाजेच्या सुमारास एका दाबेलीची गाडी लावणार्या राजस्थानी व्यक्तीवर अज्ञातांना पैश्यांच्या वादावरून चाकूने हातगाडीच्या डाव्या हातावर सपासप वार करून जखमी केल्याची घटना घडली असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून जखमी झालेल्या हातगाडी चालकास खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन ते तीन जणांनी दाबेली हातगाडीवर ऑर्डरीप्रमाणे जेवण केले. मात्र पैसे देण्याची वेळ आल्यावर आपसात वाद निर्माण झाल्याने अज्ञातांना सरळ चाकू हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून बोलले जात आहे.