जळगाव : चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील मुलीचा टोकरे कोळी जातप्रमाण पत्र 45 दिवसाच्या आत निर्णय न दिल्याने अमळनेर उपविभागीय अधिकार्यांना 500 रूपयांचा दड आकारण्यात आला आहे. कमळगाव येथील दौलत काळू कोळी यानी मुलगी कोमल,मुलगा रोहन, विरेद्र यांचे टोकरे कोळी ( अनुसूचित जमाती) चे प्रमाण पत्र मिळावे म्हणून 9 ऑक्टोबर 2015ला अर्ज केला होता.45 दिवसाच्या आत तहसिल कार्याल चोपडा मार्फत उपविभागीय अधिकारी यानां सादर करणे आवश्यक होते. या प्रकरणातील त्रुटीची सुचना दिल्यानंतर त्या त्रुटीची पुर्तता होवून उपविभागीय कार्यालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी अमळनेर यांनी 22 ऑगस्ट 2016 पारित केले की, कोमल, रोहन व विरेंद्र टोकरे कोळी या प्रवर्गात असल्याचे कागदपत्रावरून दिसून येत नाही. त्याना अपुर्या कागदपत्राअभावी टोकरे कोळी या जातीचे प्रमाणपत्र देता येत नाही असा खुलासा दिला. मात्र याबाबतीत 45 दिवसात निर्णय न घेतल्याने त्यांना अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी जळगाव यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये मर्यादित कालावधी निर्णय न घेतल्याने 500 रूपयांचा दंड करण्यात आला आहे. याप्रकरणी अर्जदाराकडून अॅड. जी.एन.सोनवणे यांनी काम पाहिले.