अमळनेर । बाजार समितीतील विकास कामांच्या उद्घाटनासाठी तीन मंत्री येणार असून त्यांचे दौरा निश्चितपणे तालुका व मतदार संघास विकासात्मक वाटचालीकडे नेणारा ठरणार आहे. त्या दृष्टीने मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, कोणी कितीही विरोध केला तरी सर्वाना सोबत घेऊन 18 जानेवारी रोजीचा कार्यक्रम यशस्वी होईल, असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला. अमळनेर बाजार समितीतील विविध विकास कामांच्या उदघाटनानिमित्त राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील, सहकार व पणन मंत्री ना.सुभाष देशमुख व जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांचे 18 जानेवारी रोजी बाजार सामितीच्या विविध कामांच्या उद्घाटनासाठी येणार असून त्यांच्याहस्ते आदर्श शेतकरी पुरस्कार तसेच नगराध्यक्ष व सरपंच यांचा सत्कार व इतर उपक्रमांचा शुभारंभ होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदार तसेच राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
बैठकीत यांची होती उपस्थिती
यापार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी भाजपा शहर ग्रामिण कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच बाजार समितीत पार पाडली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष शितल देशमुख, जि.प. सदस्य संगीता भिल, सोनू पवार, मिनाबाई पाटील, पं.स. सदस्य भिकेश पाटील, प्रफुल पवार, सरचिटणीस हिरालाल पाटील, जिजाब पाटील, उमेश वाल्हे, दिलीप ठाकूर तसेच मार्केट संचालक, पं.स. सदस्य, नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.