अमळनेर : येथील कृउबात बाजार आधुनिकीकरण प्रकल्पाचे उद्घाटन, गाळे भूमिपूजन व विविध उपक्रमांचा शुभारंभ 18 जानेवारी रोजी होत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल तथा पालक मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील व उदघाटक म्हणून सहकार व पणन मंत्री ना सुभाष देशमुख व जलसंपदा मंत्री ना गिरीष महाजन यांची उपस्थिती लाभणार आहे.सभापती उदय वाघांच्या नेतृत्वात प्रथमच तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य विकासकामांचा शुभारंभ मार्केटमध्ये होत आहे. याप्रसंगी आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण तसेच नगराध्यक्ष व सरपंच यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे,यावेळी बाजार आधुनिकीकरण प्रकल्पाचे उद्घाटन सहकार व पणन मंत्री ना.सुभाष देशमुख तर गाळे भूमिपूजन जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते होणार आहे, याव्यतिरिक्त ई-नाम योजनेचा शुभारंभ, वेबसाईट शुभारंभ मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते होणार आहे.
आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, आमदार स्मिताताई उदय वाघ, आमदार शिरीष चौधरी, खासदार ए.टी.पाटील, खासदार रक्षाताई खडसे, जि.प.अध्यक्षा उज्वलाताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री एम.के.पाटील, विजय नवल पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चांदूलाल पटेल, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर पाटील, डॉ. रवींद्र चौधरी, जि.प.शिक्षण सभापती पोपट भोळे, आरोग्य सभापती दिलीप पाटील, महिला बालकल्याण सभापती रजनीताई चव्हाण, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, अमृतराव पाटील, गुलाबराव पाटील, डॉ.बी.एस.पाटील, पणन संचालक संजय पवार, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोडे, पं.स. सभापती वजाबाई भिल, उपसभापती त्रिवेणीबाई पाटील, अर्बन बँक चेअरमन भरत ललवाणी, व्हा.चेअरमन मीराबाई निकम, खा.शि.मंडळ अध्यक्ष महेश देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष शितल देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बाजारसमिती घेतेय आधुनिकतेची गरुड झेप
बाजार समितीच्या सभापतीपदी उदय वाघ विराजमान झाल्यापासून त्यांनी केलेल्या उल्केखनिय विकास कामांमुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात विकासात्मक दृष्ट्या अमळनेर बाजार समिती अग्रेसर ठरली असून पारदर्शक व्यवहार व उपलब्द सोयी सुविधा यामुळे शेतकरीं बांधवांचा विश्वास दुपटीने वाढीस लागला आहे, शासनाकडून विविध योजनेंतर्गत अनुदान देखील उपलब्द करून विकासाची वाटचाल झाली आहे,तसेच व्यापारी गाळे वाढवून मार्केटचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न देखील उदय वाघ यांनी केला असून यासाठी संपूर्ण संचालक मंडळाचे विशेष सहकार्य त्यांना लाभले आहे,तरी दि 18 रोजी आयोजित सोहळ्यास सर्व शेतकरीं बांधवांसह हितचिंतकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन सभापती उदय वाघ,उपसभापती अनिल अंबर पाटील, व सर्व संचालक मंडळाने केले आहे.