अमळनेर । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, शेतमजूर, हमाल मापाडी, गुमास्ता यांच्यासाठी अल्पदरात जेवण (झुणका भाकर) केंद्राचे उद्घाटन सभापती उदय वाघ, उपसभापती अनिल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संचालक प्रफुल्ल पाटील, हरी भिका वाणी, उदय नंदकिशोर पाटील, महेश देशमुख, राहुल पाटील, बंडू पाटील, सुरेश पाटील, पावबा पाटील, विश्वास पाटील, भगवान कोळी आदी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, शेतमजूर, हमाल मापाडी, गुमास्ता यांच्यासाठी 10 रुपयात भाजी भाकर लोणच्यासह जेवण दिले जाणार असून अल्प दरात अतिशय चांगल्या प्रकारचे जेवण उपलब्ध करून देणारी अमळनेर बाजार समिती ही जिल्ह्यात एकमेव समिती आहे.
शेतकरी बांधवांकडून स्वागत
शेतकरी बाजार समितीत माल विकण्यासाठी सकाळी घरून निघालेला असतो. मालाचा लिलाव करून मोजमाप होते व नंतर पैशे मिळतात तोपर्यंत दुपार झालेली असते त्याना बाहेर हॉटेलमध्ये जेवण करणे परवडत नसते म्हणून बाजार समितीने सभापती उपसभापती व संचालक मंडळाने हा निर्णय घेऊन शेतकर्यांसाठी झुणका भाकर केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला हे केंद्र आठवडाभर सुरु राहणार असून सात दिवसासाठी सात मेनु ठरविण्यात आले आहे. स्वाधीष्ट व रुचकर जेवण अल्पदरात उपलब्ध असल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे तर शेतकरी, शेतमजूर, हमाल मापाडी, गुमास्ता व व्यापारी वर्गातून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.