अमळनेर तहसीलसमोर अंनिसचे ‘जवाब दो‘ आंदोलन

0

अमळनेर । महाराष्ट्रातील समाज सुधारक डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे तर कर्नाटक मधील प्रा.एम.एम.कलबुर्गी ह्यांचा खून झाला. त्यामधील राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे झालेल्या अक्षम्य दिरंगाईबाबत जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे 20 जुलै ते ते 20 ऑगस्ट महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेर देखील ‘जवाब दो‘ आंदोलन छेडले त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार 8 ऑगस्ट रोजी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमळनेर तहसीलच्या आवारात आंदोलन करत तहसीलदार प्रदीप पाटील निवेदन यांना दिले.

आंदोलनात यांनी घेतला सहभाग
समाज सुधारक डॉ.नरेंद्र दाभोळकर याच्या खुनाला 47 महिने, कॉ.गोविंद पानसरे यांच्या मृत्यूला 29 महिने तर कर्नाटकातील प्रा.डॉ.एम.एम.कलबुर्गी याच्या खुनाला 17 महिने झाली आहे. मात्र अद्यात कोणत्याही आरोपील शोध व तपास लागला नाही. यावेळी चेतन सोनार, डी.ए.सोनावणे, डॉ.दिनेश पाटील, राकेश सोनावणे, सुनील वाघमोडे, चंद्रकांत जगदाळे, नीतिन वाघ, जगदीश तावडे, भारती गाला, भटू पाटील, वसुंधरा लांडगे, विश्वास पाटील, रणजित शिंदे, डॉ.अतुल चौधरी, दर्शन पवार उपस्थित होते.