अमळनेर। उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. नागरिकांची पाणी टंचाईची समस्या जाणवायला लागली असून. पाणी टंचाईची तीव्रता वाढत चालली आहे. अमळनेर तालुक्यातील आणखी चार गावांना नव्याने टँकर मंजूर झाले आहेत. तालुक्यातील 10 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा आहे. तसेच 33 गावांची विहीर अधिग्रहीत केली असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
तालुक्यातील सबगव्हाण, शिरसाळे, भरवस, लोणपंचम या गावांना टँकर मंजूर झाले असून यापूर्वी डांगर बु., वासरे, खेडीखर्दे, पिंपळे बु., धानोरा, देवगाव, देवळी या गावांना टँकर सुरु आहेत. तसेच सुंदरपट्टी, मंगरुळ, वावडे, इंदापिंप्री, सारबेटे या गावांचे टँकर प्रस्ताव आलेले आहेत. अमळनेर येथुन बंगाली विहीर, पांझरापोळ येथील विहीर तर भिलाली येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीवरुन टँकर भरले जातात. तालुक्यातील एकूण 33 गावांना विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर मालपूर येथील विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव आलेला आहे. प्रत्यक्ष गावांची पाहणी करुन तात्काळ जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठवले जातील. पांझरा नदीला पाणी आल्याने काठावरील गावांचा पाणी प्रश्न तूर्त सुटला आहे, असेही तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले.