अमळनेर तालुक्यातील मुलीवर अतिप्रसंग : बाप-बेट्याविरोधात गुन्हा

Attempted rape of a minor girl : A crime against father and son अमळनेर : अमळनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार, 4 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून या प्रकरणी पिता-पूत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भूषण साहेबराव पाटील आणि साहेबराव हरचंद अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
पीडीत मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार सुमारे आठ महिन्यांपासून वेळोवेळी व शुक्रवार, 4 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना संशयीत भूषणने पीडीतेचे तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आपल्या नातीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न होत असल्याचे आजीने भूषणचा प्रतिकार केला मात्र अल्पवयीन मुलीच्या आई व आजीला मारहाण करीत त्याने पळ काढला व काही वेळाने भूषणसह त्याचे वडील साहेबराव असे दोघे तेथे आले. त्या दोघांनी मिळून जातीवाचक गलिच्छ शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस अधिक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत.