अमळनेर तालुक्यातील रस्ता दुरूस्ती व डांबरीकरणास निधी

0

अमळनेर । अमळनेर । रस्ता देखभाल दुरुस्ती योजनेत तरतुदीतून अमळनेर विधानसभा मतदार संघात रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या विशेष दुरुस्ती कार्यक्रमातर्गत 5 कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार शिरीष चौंधरी यांनी दिली. या कामांमुळे ग्रामीण भागातील महत्वाचे रस्ते एकमेकांशी जोडले जाऊन ग्रामीण जनतेच्या दृष्टीने अतिशय सोयीचे होणार आहे. या कामासाठी आमदार चौधरी यांनी सततचा पाठपुरावा मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस व सार्व बांधकाम मंत्री ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे केला होता अखेर त्यांनी या कामास मंजुरी देऊन 5 कोटी भरघोस निधीची बरसात अमळनेर मतदार संघावर केल्याने आमदार चौधरी यांनी जनतेच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत दरम्यान लवकरच या कामाची ई निविदा प्रसिद्ध होईल व यानंतर टेंडर प्रोसेस होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे आमदार चौधरी यांनी सांगितले.

या गावातील काही भागांचे रस्ते मार्गी लागणार
जळोद, अमळनेर, सडावण, कलाली, निभोरा, पिंगलवाडे, नंदगाव, मठगव्हाण, जळोद, दोधवद, कलाली, डांगरी, बोहरा, निम, वावडे, जवखेडे, रणाईचे,जानवे, कावपिंप्री, बहादरपूर, पारोळा, फाफोरा, अमळनेर, धार, मारवड, कळमसरे, निंब, भिलाली, मुडी, मांडळ, गलवाडे, चौबारी, पाडसे, रेल्वे स्टेशन, मटगव्हाण, पातोंडा, दहिवद बु. टाकरखेडा यांचा समावेश आहे. आदी रस्त्यांची निवडक लांबी मध्ये रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. दरम्यान आमदार शिरीष चौधरी यांनी आतापर्यंत शहरी मुख्य रस्त्यासह ग्रामीण रस्त्यासाठी भरघोस निधी आणल्याने अनेक रस्ते वाहतुकयोग्य झाले आहेत परिणामी ग्रामीण जनतेचा शहराशी संपर्क साधून त्यांच्या शेतीपूरक व्यवसायास देखील चालना मिळत आहे विशेष करून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी देखील हे सोयीचे झाल्याने विद्यार्थ्यांचा शहराकडे ओघ वाढत असल्यामुळे आमदार शिरीष चौधरी विशेष कौतुक होत आहे.