अमळनेर तालुक्यातील 11 तलाठी सजांची नवनिर्मित

0

अमळनेर । तालुक्यातील तलाठी सजा वाढीव होण्याच्या संदर्भात विधापरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांचे प्रयत्नास यश मिळाले आहे. नुकतीच तलाठी सजा पुनर्रचना प्रारूप अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात 11 तलाठी सजांची नवनिर्मित करण्यात आली असून, आता एकूण 57 तलाठी सजा झाल्या आहेत. तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र,महसूल मंडळ अंतर्गत असणार्‍या तलाठी सजा मुख्यालय यातील लोकसंख्या, खातेदार संख्या आणि सजेतील मुख्यालयापासूनचे अंतर याबाबी लक्षात घेवून, अमळनेर तालुक्यासाठी तलाठी सजा वाढीव म्हणजे पुनर्रचना होणे बाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी यांचेकडे आमदार स्मिता वाघ यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती तसेच वेळोवेळी पाठपुरावाही सुरु होता.

जिल्ह्यात 146 नवीन तलाठी सजा
अमळनेर तालुक्यातील तलाठी सजेतील समाविष्ट गावांतील लोकसंख्या नुसार सजांची नवनिर्मिती झालेली आहे. यात अमळनेर पूर्व,अमळनेर उत्तर,मंगरूळ उत्तर,मंगरूळ दक्षिण, रुंधाटी,कन्हेरे,करणखेडे,जानवे,पळासदळे,कुर्‍हे खु.,म्हसले, लोण बु. यांचा समावेश आहे. यामुळे सजेतील खातेदार नागरिकांना तत्काळ सोयी सुविधा मिळतील आणि नागरिकांच्या समस्या लवकरच सूटतील व वेळेत संबंधित विभागातून सेवा मिळेल. जिल्ह्यात एकूण 146 नवीन तलाठी सजांची निर्मिती करण्यात आलेली आहे. सन 2020 पर्यंत टप्प्याटप्याने नवीन तलाठीची नियुक्ती होईल आणि शेतकरी व नागरिकांचा त्रास कमी होणार असून, दैनंदिन कामकाजाला गती मिळेल असा विश्वास आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे.