अमळनेर तालुक्यात इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी

0

अमळनेर (अमोल पाटील) : येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातील तापमान हे कडाक्याच्या थंडीतही गरम होतांना दिसून येत असून राजकीय हालचाली व योग्य उमेदवारांची निवडीच्या हालचाली जोरात सुरु आहेत तर पक्ष व आघाडी मार्फत उमेदवारी कशी मिळवता येईल यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपापली शक्ति पणाला लावत आहेत. तालुक्यात शहर तसेच ग्रामीण भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गारठा वाढल्याने अचानक तापमान कमी झाले आहे. मात्र या गारठयातही अमळनेरचे वातावरण गरमच असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुका व जानेवारी महिन्यात येवू घातलेल्या जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे तालुक्यात राजकीय घडामोडी ना वेग आला आहे. त्यामुळे साहजिकच गुलाबी थंडीतील तालुक्यातील राजकीय गरम वातावरण कोणाला पोषक व कोणाला दुखावह ठरते हे येणार्‍या काळात स्पष्ट होईल.

गेल्या महिन्यात झालेल्या संवेदनशील प्रकाराबाबत नागरीकांमध्ये प्रश्‍नचिन्ह
तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणूक आणि निवडणूक दरम्यान घडलेला सवेदनशील प्रकार, पोलिसांच्या कामगिरिवर उपस्थित झालेले प्रश्न चिन्ह, त्यानंतर पोलीस प्रशासनाने घेतलेली कठोर भूमिका, शहरातील पोलीस बंदोबस्तात निघालेले अतिक्रमण, ‘अमळनेर बंद’ची हाक आणि लगेच स्थगित. सुभाष चौकतील खून, रात्री नऊ नंतर शहरात मनसोक्त वावरण्यावर आलेली गदा, नागपुर अधिवेशनात पालिका निवडणुकीतील हाणामारी, तोडफोड, गुन्हेगारी या सगळ्या हिंसक प्रकाराची आमदार डॉ.सतीश पाटील, आमदार शिरीष चौधरी या दोन्ही नेत्यांनी आमने-सामने थेट लक्षवेधी सुचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा केलेला प्रयत्न. हा सर्व घटनाक्रम, अमळनेरकरांसाठी विचार करायला लावणारा आहे तर अशा वातावरणामुळे शांतता प्रिय शाहराचे नाव संपूर्ण राज्यात गाजले. नगरपालिका निवडणुकीत झालेला सर्व प्रकार हा शहराची प्रतिमा मलिन करण्याचा होता एकूणच पालिका निवडणुकीपासून आज तागायत शहराचे राजकीय वातावरण धग धगते आहे. आजी-माजी आमदारांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फायरी आजही झाडल्या जात आहेत, परम पूज्य साने गुरूजी यांची कर्मभूमी व संत सखाराम महाराज यांच्या पावनभूमि म्हणून ओळख असलेल्या शांत अमळनेर मध्ये राजकीय स्वार्था पोटी सर्व सामान्य अमळनेरकर मात्र, अशांत वातावरणात वावरतांना दिसून आला. राजकारणामुळे दूषित झालेले समाजाचे मन आता सत्ताधारी व विरोधक यांनी एक पाऊल पुढे येवून हे समाज मन शुद्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुका व शहराचा केवळ विकास हे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून योग्य दिशेने मार्ग क्रमण करणे सर्व्याच्याच हिताचे ठरणारे आहे.

आरक्षणामुळे काही उमेदवारांच्या आशेवर फिरले पाणी
जानेवारी महिन्यात येवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकासाठी इच्छुकांनी जोरदार भेठी गाठी सुरु केल्या आहेत.गट आणि गनाचे आरक्षण जाहिर झाल्या पासून हौशी ईच्छुक उमेदवारांनी गुडघ्यला बाशिंग बांधलेले आहेत. जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गण यांच्या आगामी निवडणुकांचे आरक्षण पाहता बहुतांश ठिकाणी महिलाच नेतृत्व करतांना दीसुन येणार आहेत.असे असले तरी ईच्छुक सौभाग्यवतींचे हौशी यजमान स्वतःच उमेदवार असल्याचे समजत भासवत मतदारांच्या भेठीगाठीत रमले आहेत. तालुक्यात जिप चे 4 गट तर पंचायत समितीसाठी 8 गण आहेत. त्यातच दोन गण कमी झाल्याने काही गण हे विभागले गेले आहे. त्यामुळे बरेच उमेदवार नाराज झाले तर आरक्षण जाहिर होण्याच्या अगोदर गुडग्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. यातच आरक्षणाने काही उमेदवारांच्या आशेवर पाणी फिरल्याने बर्‍याच उमेदवारांना आरक्षणामुळे उमेदवारी अर्ज सुध्दा दाखल करता येणार नाही. मात्र नवख्या नवख्या उमदेवारांसाठी ही एक सुवर्ण संधी असल्याचे जानकारांचे मत आहे.