अमळनेर तालुक्यात ओबीसी मेळावा नियोजन बैठक

0

अमळनेर । येथील शासकीय विश्राम गृह येथे ओबीसी नेते अनिल महाजन यांची नियोजन बैठक उत्साहात पार पडली. येत्या 2 ऑक्टोबर 17 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान हॉटेल सिल्वर पॅलेस स्टेशन रोड जळगाव येथे ओबीसी महामेळावा आयोजन करण्यात आले असल्यामुळे त्यासंदर्भात नियोजन बैअल्पावधित संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धीत आलेली ओबीसी जनक्रांती परिषदेच्या वतीने नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीस उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले.

बैठकीची संकल्पना ओबीसी जनक्रांती परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख विनायकजी यादव यांनी सर्वान समोर मांडली. यावेळी ओबीसी जनक्रांती परिषदेचे संस्थापक अनिल महाजन, आर.बी.माळी, दिनेश माळी माजी उपसरपंच, क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंचचे संस्थापक प्रवीण बी.महाजन, मुरलीधर चौधरी, माजी नगरसेवक बाळासाहेब महाजन, दीपक चौधरी, अमोल माळी, शरद खैरनार, ज्ञानेश्वर पाटील, कृष्णा बाविस्कर, संजय महाजन सचिन पाटील, दीपक पाटील, गोपाळ माळी, ग.का.सोनवणे, सुरेंद्र बोरसे, धीरज माळी, गणेश महाजन, खेमचंद बोरसे, आर.एस.माळी, शिवाजी महाजन, सुरेश माळी, विजय माळी, योगेश पाटील यांच्यासह क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच, महाराष्ट्र युवा फेडरेशन, लोक क्रांती सेना, महाराष्ट्र माळी महासंघचे शाखा प्रमुख पदाधिकारी कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते