अमळनेर तालुक्यात जानेवारी महिन्यातच पाणी टंचाई

0

अमळनेर । जिल्ह्यात यावर्षी पावसाळयात पावसाचे प्रमाण अधिक प्रमाणात हाते. तरी सुद्धा तालुक्यातील तापी काठावरील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र जानेवारी,फेब्रुवारी महिन्यातच दिसून येत आहे. त्यातच तापी नदीचे पात्र कोरडे ठाक पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे तापी नदिकाठावरील गांवानाही भीषण पाणी टंचाईचा सामना करवा लागेल असे चित्र दिसून येत आहे. ह्यावर्षी गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण चांगले होते. तापी नदीस बराचदा पुर आल्याने काठावरील गावांना ह्यावर्षी पाणी टंचाई भासणार नाही असे दिसत होते. परंतु जानेवारी महिन्यातच तापी नदीचे पात्र कोरडे झाल्याचे दिसत आहे. पूर्ण पात्रात काही काही ठिकाणीच फ़क्त डबके साचले असल्याने डबक्यातील पानी किती दिवस पुरेल याची चिंता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

परिसरातून वाळूचा उपसा सुरुच

तालुक्यातील सावखेड़ा येथील वाळू ठेका दिला गेल्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा नदी पात्रातून होत आहे एकाच वेळी 6 बोटिद्वारे वाळू उपसा होत आहे. हजारो ब्रास रेतीचा उपसा रोज होत असल्यामुळे पाण्याची पातळी खोल जात आहे. तापी नदीपात्रातील धावड़े येथून धरणगाव शहर, कठोरा येथून चोपड़ा, जळोद येथून अमळनेर तर दोंदवाडे येथून चहार्डी येथील साखर कारखान्यास पाणी पुरवठा केला जात असल्याने तापी नदी पात्रातील वाळू उपसा जर असाच सुरु राहिला तर भविष्यात या तिन्ही शहराना पाणी टंचाइचा मोठा सामना करावा लागेल.

डांगरसाठी प्रसिद्ध पात्र

तापी नदी पात्रात परीसरातील नागरिक डांगर लागवड करित असतात. दरवर्षी लाखो रुपयाचे उत्पन्न या लागवडीतून येत असते. परंतु ह्या वर्षी नदीचे पात्रच कोरडे असल्याने डांगर शेती दिसून येत नाही. त्यामुळे ह्या शेतकर्‍यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागेल तर बाजारात बाहेरून डांगर मागवावे लागेल असे चित्र समोर येऊन ठाकले आहे.