अमळनेर। तालुक्यातील कळमसरे येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला परिसरातील शहापुर, तांदळी, कळमसरे, निम, पाडळसरे, वासरे-खर्दे या सात गावांच्या विविध कार्यकारी सह सोसायटीच्या संस्था संलग्न असून या सोयायटींच्या जवळपास 1261 सभासदांपैकीनियमीत कर्जफेड करणारे 467 कर्जदार खातेदार शेतकर्यांस स्वतंत्र रूपे डेबिट एटीएम कार्ड वितरीत करण्यात आले. रूपे डेबिट एटीएमच्या माध्यमातून 2 कोटी 67 लाख रूपयांचे कर्ज वाटप रक्कम 30 जून अखेरपर्यंत करण्यात आले.
विकासोच्या अधिकार्यांकडून कामकाजासाठी हातभार
यात वारील सात गावांच्या सहकारी सोसायटीत कार्यरत गटसचिव सुधाकर पाटील, कैलास पाटील, सुनिल पाटील, भगवान पवार, दिलीप पाटील या गटसचिवांनी रूपे डेबिटकार्डने कर्जपुरठ्यासाठी लागणारे विविध कागद पत्रांची पूर्तता बँकेस करून दिल्यावर शाखा व्यवस्थापक संजय पाटील यांनी बँकेतील सह कर्मचारी रघुनाथ कदम, किसन पाटील, दरबारसिंग राजपुत्र यांच्या मदतीने बँकेची कार्यालयीन कामकाज पुर्ण करून खरिप हंगामातील पिक कर्ज 30 जून 2017 पर्यत वेळेस भरून दिले.
467 शेतकर्यांना किसान रूपे डेबिट कार्ड वितरीत करण्यात आले. त्याची सुरूवात वासरे-खर्दे गृप विकासो व्हा.चेअरमन रघुनाथ पाटील व कळमसरे विकासोचे सभासद शेतकरी सुमनबाई पाटील, सुनिल पाटील यांना शाखा व्यवस्थापक संजय पाटील व कळमसरे गटसचिव सुधाकर पाटील यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात रूपे डेबिटकार्ड देऊन कर्ज वितरणाची सुरूवात करण्यात आली. यावेळी वासरे सोसायटीचे चेअरमन मधुकर शेनपडू पाटील, पाडळसरेचे राजेंद्र दगा पाटील, कळमसरेचे अंकुश पाटील, विजय चौधरी, काशिनाथ चौधरी, राजे दरबारसिंग राजपूत, भिमराव पाटील, हभप मुरलीधर महाजन आदी शेतकरीवर्ग उपस्थित होते.
एटीएमवर शेतकर्यांची भटकंती
पैसे काढण्यासाठी मात्र तालुक्यातील जिल्हा बँकेच्या एकही शाखेत सोय नसल्याने शेतकर्यांची शहरातील एटीएमवर भटकंती सुरूच असते त्यात अशिक्षित किंवा अल्पशिक्षीत शेतकरी एटीएम मशीन शोधतात तर शहरातील सरकारी बँकांचे एटीएम मशीन बहुदा तांत्रिक कारणाने बंद किंवा पैसेच नसतात म्हणून भाडे खर्चून अनेक शेतकरी खाली हाताने परत येतात. एटीएम मशिन उपलब्धतेसोबत त्यात पैसेही असावेत जेणे करून शेतकर्यांना पैशांसाठी वणवण फिरावे लागणार नाही. अशी अपेक्षाच शेतकरी व्यक्त करित आहेत.