अमळनेर तालुक्यात बोंड अळीमुळे शेतकरी त्रस्त

0

अमळनेर : अमळनेर तालुका क्षेत्रातील कपाशी पिकावर झालेल्या बोंड अळीचा प्रदुर्भावाचा शासनाकडून पंचनामा होऊन संबंधित शेतकर्‍यांना त्याची त्वरित नुकसान भरपाई करण्याची मागणी, अमळनेर ग्रामीण काँग्रेस कमिटीचे तालुकाअध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे. निवेदनावर सुलोचना वाघ, भागवत सूर्यवंशी, अ‍ॅड. गिरीश पाटील, प्रविण जैन सुरेश पाटील, मगन पाटील, प्रताप पाटील, मिराबाई निकम, हिम्मत पाटील यांच्या सह तालुक्यातील नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
अमळनेर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि बोंड अळीचा कपाशी पिकावर मोठ्या प्रामाणावर प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे उच्च प्रतीच्या औषधांची फवारणी करून देखील कीड नियंत्रणात येत नसल्याने बीटी2 कपाशी बियाणांसह अन्य प्रकारच्या कपाशी बियाण्यावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱयांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱयांच्या शेतातील बोड अळीमुळे नष्ट होवून नुकसान झालेल्या कपाशी पिकाचा पंचनामा होवून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी अमळनेर ग्रामीण काँग्रेसने केली आहे.