अमळनेर तालुक्यात विविध ठिकाणी रिपाइंची स्थापना

0

अमळनेर : तालुक्यातील बोहरा, धार, शहापूर, तांदळी याठिकाणी आरपीआय आठवले गटाची शाखांची स्थापना जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ खरात यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी रवींद्रभाऊ खरात यांनी तांदळी गावी शाखेचे फलक अनावरण केले. सदर प्रसंगी बोलताना त्यांनी आरपीआय संघटना ही केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून ती सर्व बहुजन समाजासाठी कार्य करणारी करणारी संघटना आहे.या शाखेत सर्व समाजांचा समावेश करावा.यावेळी त्यांनी अमळनेर तालुका आरपीआयची कार्यकारणी जाहीर केली. त्यात तालुकाध्यक्ष रमेश शिरसाठ, युवाध्यक्ष दाजीबा गव्हाणे, शहराध्यक्ष नरेंद्र संदनशिव तर आरपीआय मातंग समाज आघाडी तालुका अध्यक्ष पदी संजय फकिरा मरसाळे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सुनील तायडे (यावल), दिवाणजी साळुंखे(चोपडा), सुरेश कांबळे (अमळनेर), विनायक शिरसाठ(तांदली) यांची उपस्थिती होती. तर जेष्ठ कार्येकर्ते यशवंत बैसाणे, रमेश शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले.