अमळनेर: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अपंगासाठी 3 टक्के राखीव निधी निधीतून अपंगाना आर्थिक मदत करण्यात येत असते. त्यानुसार अमळनेर नगरपरिषदेने दिव्यांगाना आर्थिक मदत दिली आहे. 134 लाभार्थ्यांना 2018-19 या वित्तीय वर्षासाठी प्रती लाभार्थी ७ हजार प्रमाणे 9 लाख 38 हजार रुपये वाटप करण्यात आले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, संजय चौधरी, योगेश पवार आदींच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी याप्रसंगी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे ऍड.कविता पवार, शशिकांत सूर्यवंशी, पंकज पाटील , योगेश पवार, दीपक पाटील आदी उपस्थित होते.