अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी कार्यमुक्त

0

अमळनेर। नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे यांची प्रशासकीय कारणास्तव गुरुवारी 18 पासून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यानंतर या पदाचा कार्यभार जिल्हा प्रशासन अधिकारी अनिकेत मनोरकर यांच्या कडे सोपविण्यात आले आहे. तसे आदेश नगर विकास विभागाकडे आले आहे. असे आदेश सहसचिव ज.ना पाटील यांनी दिले आहेत यावरून मुख्याधिकारी सोनवणे यांनी तात्काळ पदभार सोडला आहे. दरम्यान महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोथान अभियानांतर्गत भुयारी गटारीसाठी राज्य शासनाने 24 नोव्हेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार नगरपरिषदेला 66.75 कोटीच्या योजनेस प्रशासकीय मंजुरी दिली आहे. नगरपरिषदेने सदर प्रकल्प पुढील अमलबजावणीसाठी निधीसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवावा असे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या कामाबाबतच्या एमबी रेकॉर्डिंग करण्याबाबतची कागदपत्रे आपण ताब्यात घ्यावीत व त्यानंतर प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रत्यक्ष हस्तातरित होईपर्यंत कोणतेही नवीन एम.बी. रेकॉर्डिंग चे काम होणार नाही याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करावी असे विभागीय उपसंचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय नाशिक विभाग नाशिक यांनी पत्रकान्वये सांगितले आहे. प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतल्यानंतरच त्या कामास पुन्हा सुरवात करण्यात यावी असा आदेश पा.जो.जाधव सह सचिव नगर विकास विभाग यांनी दिले आहेत.