अमळनेर- नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी शोभा बाविस्कर यांची बदली झाली असून त्या आज पदभार घेणार आहेत. बाविस्कर यांची जामनेरहुन अमळनेरला बदली झाली आहे. अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुटे यांना ३ एप्रिल रोजी निलंबीत करण्यात आले होते त्यानंतर बी.टी.बाविस्कर यांची डे ३१ मे पर्यंत प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती . ते ३१ मे ला सेवानिवृत्त झाल्याने पुन्हा चाळीसगाव पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांच्याकडे ३ ते १२ जून पर्यंत पदभार होता.