अमळनेर पं.स सभापती पदी रेखा पाटिल , उपसभापती भिकेश पाटील बिनविरोध

0

अमळनेर : अमळनेर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणूक संपन्न झाली. यात अमळनेर पंचायत समितीच्या सभापती पदी रेखाबाई नाटेश्वर पाटिल तर उपसभापती पदी भिकेश पावभा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड झालेले उमेदवार हे भाजपचे असल्याने. भाजपची एकहाती सत्ता बसली आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या निवडीमुळे नवनिर्वाचित सभापती रेखाबाई पाटील व उपसभापती भिकेश पाटिल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.