अमळनेर :- अमळनेर येथील धुळे रस्त्यावरील आर के नगर येथील पटेल दर्जा या कारखान्यास पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली असून या आगीत लाखो रुपयांचा कच्चा माल जळून खाक झाला असून याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल नसल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
आर के नगर परिसरात उद्योजक विनोदभैया पाटील यांच्या मालकीच्या असणाऱ्या पटेल दर्जा या तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यास दि 3 रोजी पहाटे चार ते पाच वाजेदरम्यान शॉर्ट सर्किट ने आग लागली आग लागली या आगीत कारखान्यातील लाखो रुपयांचा तंबाखूचा कच्चा माल जळून खाक झाला आहे. अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन बंबात खाजगी टँकर ने पाणी पुरवठा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यास कारखान्यातील कामगारांनी यश मिळवले असले तरी आग कशामुळे लागली याचे अद्याप कारण समजू शकले नाही.
या आगीतील जळालेली तंबाखू महीला व पुरुष कामगारांनी तोंडाला कापड,रुमाल बांधून टोपलीच्या साहाय्याने ट्रॅक्टरने बखळ जागेत जळालेला माल टाकण्यात आला. याबाबत अमळनेर पोलिसात तक्रार दाखल नसल्यामुळे आग लागली की लावली याबाबत परिसरात दिवसभर चर्चा होती.या आगीचा परिसरातील नागरिकांना तंबाखूच्या दुर्गंधीयुक्त वासाने दिवसभर मोठा त्रास सहन करावा लागला