स्नेहमीलन कार्यक्रमात पार पडला सत्कार सोहळा
अमळनेर – अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी स्थानिक वृत्तपत्राचे संपादक चेतन देवसिंग राजपूत यांची एकमताने निवड झाल्याने दसऱ्यानिमित्त विश्राम गृहात आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे सर्व जेष्ठ आणि क्रियाशील सदस्य उपस्थित होते. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ नोंदणीकृत असून सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे प्रतिनिधी व स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकांचा यात समावेश आहे,संघटनेच्या नूतन अध्यक्षपदी चेतन राजपूत यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली होती. सदर निवडीनंतर विश्राम गृहात दसऱ्यानिमित्त स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सर्वांनी एकसंघ राहण्याची भावना व्यक्त केली. तसेच नूतन अध्यक्षपदी चेतन राजपूत यांची निवड झाल्याने सर्व उपस्थित सदस्यांनी तसेच आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी आणि सामाजिक संघटनांनी व विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचा सामूहिक सत्कार केला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे संस्थापक माजी अध्यक्ष किरण पाटील, सचिव चंद्रकांत पाटील, जेष्ठ पत्रकार पंडित चौधरी, पांडुरंग पाटील, संजय पाटील, राजेंद्र पोतदार, माजी अध्यक्ष चंद्रकांत काटे, महेंद्र रामोशे, जितेंद्र ठाकूर, विजयकुमार सुतार, विवेक पाटील, जयेश काटे, योगेश महाजन, भटेश्वर वाणी, सदानंद पाटील, आबीद शेख, मुन्ना शेख, कुंदन खैरनार, ईश्वर महाजन, अमोल पाटील, जितेंद्र पाटील, धर्मवीर पाटील, महेंद्र पाटील, मिलिंद पाटील, भूपेंद्र पाटील, सचिन चव्हाण, सुखदेव ठाकूर आदी सदस्य उपस्थित होते.