नागरीकांचे आरोग्य धोक्यात
अमळनेर – अमळनेर नगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मिल चाळ धर्म शाळा परिसरातील शौचालयाची सेप्टिक टॅंक लिकेज झाल्यामुळे त्या टाकीतून अळ्या बाहेर पडू लागल्यामुळे दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरली आहे. नागरिकांनी वारंवार तोंडी तसेच लेखी तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने नागरिकांमध्ये न.पा. प्रशासन लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक नगरसेवक यांच्याविषयी तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. नगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस केंद्र तसेच महाराष्ट्र शासन स्वच्छ भारत अभियान राबवत असतांना अमळनेर मध्ये मात्र घाणीचे साम्राज्य पहावयास मिळते. विकास कामांचा डंका पिटणारे लोकप्रतिनिधी मात्र या ठिकाणी सपशेल अयशस्वी झालेले आपल्याला पहावयास मिळते आहे. या ठिकाणी हे लोकप्रतिनिधी 1 सेंकंद सुद्धा थांबू शकत नाही, एवढी दुर्गंधी या परिसरात पसरली आहे.