अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला अखेर ‘दाऊद’

What do you say ! The adamant criminal ‘Dawood’ was found in the dust अमळनेर : कुख्यान डॉन दाऊद इब्राहिमचा देशभरासह आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा शोध घेत असतानाच अमळनेर पोलिसांनी मात्र स्वतःला दाऊद म्हणवून घेणार्‍या कुविख्यात शुभम उर्फ शिवम देशमुखच्या धुळे शहरातून मुसक्या बांधल्या आहेत. आरोपी देशमुख विरोधात चोरी, घरफोडीसह अन्य गुन्हे दाखल असून गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी पसार झाल्याने त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून कारवाई
संशयीत दाऊद उर्फ शुभम देशमुख (रा.लाकडी वखारीमागे, संविधान चौक, अमळनेर) विरोधात चोरी, दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न असे 27 गुन्हे दाखल असून ऑगस्ट महिन्यात तो जामिनावर सुटल्यानंतर दोन गुन्ह्यात पसार झाला मात्र आरोपी धुळ्यात बहिणीकडे आल्याची माहिती अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी पथक पाठवून आरोपीच्या मुसक्या बांधल्या.

यांनी केली कारवाई
धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रामकुमार व चाळीसगाव विभागाचे अपर अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव व पोलिस निरीखक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भुसारे, सुनील हटकर, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, अमोल पाटील, निलेश मोरे, समाधान पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.