अमळनेर : शहरातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीवरुन अमळनेर पोलिसांनी मंगळवारी सकाळी 6 वाजता चोपडा नाक्यावर दहा ते 12 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. आयशर गाडीतून हा गुटखा वाहून नेला जात होता. नूतन पोलीस निरीक्षक अंबादास मोरेंच्या यांच्यासह कर्मचार्यांनी ही कारवाई केली.