अमळनेर। मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिना सध्या सुरु आहे. त्या निमित्त अमळनेर पोलीस ठाण्यामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शुक्रवारी 23 रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड होते. रोजा इफ्तार पार्टीत जातीय सलोखा अबाधित राहून शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. सोबतच अॅड.शकील काझी, अॅड.सलीम खान, सुभाष चौधरी यांनी मनोगते व्यक्त केली. प्रसंगी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना करून रोजे सोडले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास रफिक शेख, नायब तहसीलदार प्रशांत वाघ, लालचंद सैनानी, रामभाऊ संदानशिव, प्रवीण पाठक, सुनील भामरे, श्रीराम चौधरी, संतोष लोहेरे, सलीम टोपी, ईकबाल कुरेशी, यु.डी महाजन, सोमचंद संदानशिव, संजय चौधरी, पोलीस उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे, देविदास बिर्हाडे, दिनेश संदानशिव उपस्थित होते. सूत्र संचालन डिगंबर महाले यांनी तर आभार विकास वाघ यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनील पाटील, प्रमोद बागडे, विशाल चव्हाण, जे.डी.पाटील, भटूसिंग तोमर यांनी परिश्रम घेतले.