अमळनेर प्रांताधिकारी कार्यालयावर आदिवासी सामाजाचा ताट वाटी मोर्चा

0

अमळनेर : आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी ८ रोजी शहरातील राजपुत्र एकलव्य सेना, आदिवासी एकता परिषद तसेच विविध संघटनानी मोर्चा काढला. एकलव्य सेना प्रमुख राज साळवी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. सुभाष चौकातून बसस्थानक मार्गे प्रांत कार्यालयावर आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता.

हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात पोचल्यानंतर, त्यांना बाहेर अडवण्यात आले प्रांताधिकारिनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे असा निर्णय मोर्चेकरांनी घेतला. नायब तहसीलदार चौधरी आणि दिनेश सोनवणे यांनी कार्यालया बाहेर येऊन निवेदन स्वीकारले.राज साळवी एकलव्य सेना प्रमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अनिल पाटील यांनी कार्यालयात जाऊन काही प्रातिनिधिक महिलांसोबत ताट, वाटी देऊन निवेदन दिले.

प्रमुख मागण्या
खावटी कर्ज वाटप करून ५ हजार रूपये मिळावेत. आदिवासींचे दाखले इतर कोणत्याही समाजाला देऊ नये. प्रकल्प कार्यालय अमळनेर येथे व्हावे. भूमिहीन आदिवासी कुटुंबांना १० एकर जमीन वाटप करण्यात यावी. बेघरांना जागा देण्यात यावी. आदिवासी कुटुंबांना दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार ५ लिटर दारू ठेवण्याच्या अधिकाराची अमलबजावणी करावी. स्थानिक पातळीवर मच्छिमार करण्यासाठी तलाव, धरणांचा ताबा द्यावा. अतिक्रमित गायरान , गावठाण वनीकरण जमिनीवर शेतीसाठी झालेले अतिक्रमण पिकपेरे लावून नियमित करावे. यामाग्न्याचे निवेदन देण्यात आले आहे. शिष्टमंडळ प्रांताधिकारी यांच्यासोबत चर्चा करीत असताना, आदिवासी समाजाने पोलिसांना न जुमानता तहसील कार्यालयाचे गेट तोडून आतमध्ये प्रवेश करत घोषणाबाजी, थाळीनाद केली. मोर्चाचे नेतृत्व एकलव्य सेनाप्रमुख राज साळवी, जिल्हाध्यक्ष गोविंदा माळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, गावरान जागल्या संघटनेचे प्रा.विश्वास पाटील, आदिवासी एकता परिषदेचे आंनद पवार, प्रा.जयश्री साळुंखे, कॉ.लक्ष्मण शिंदे, कोळी महासंघाचे गोपीचंद निकम, रावसाहेब पवार यांनी केले.