अमळनेर प्लास्टिक असोसिएशनतर्फे बेमुदत बंद

0

अमळनेर । महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, शीट, पॅकिंग इ. वस्तूंचे उत्पादन, साठा, विक्रीवर सरसकट बंदी आणल्याने अमळनेर प्लास्टीक असोसिएशन ने या सरसकट बंदीच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत आपली दुकाने बेमुदत बंदचा पवित्रा घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील सर्व होलसेल दुकाने बंद दिसत आहे. जळगाव जिल्हा प्लॅस्टिक असोसिएशनच्या आवाहनानुसार हा बंद ठेवण्यात आला आहे. प्रमुख प्लास्टिक विक्रेत्यांची दुकाने बंद असताना काही किराणा दुकानदार प्लास्टील कॅरीबेग, चहा व पाणी ग्लास, पत्रावळी, द्रोण आदींची किरकोळ विक्री करीत असल्याने त्यांनाही प्लास्टिक असोशिएशनने पत्र देऊन या वस्तूंची विक्री बंद ठेवत असोसिएशनला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.