अमळनेर बसस्थानकावरून दागिन्यांसह रोकड लंपास

0

अमळनेर । शहरात दोन हत्याकांडानंतर पोलीस प्रशासनावर वाढत्या गुन्हेगारीबाबत आगपाखड होत असताना येथील बसस्थानकावर एका महिलेचे सोळा ग्राम सोने आणि सात हजार रोख असा ऐवज लंपास झाल्याची घटना 5 रोजी दुपारी 1,40 वाजेच्या सुमारास घडली .एका महिलेनेच दागिने व रोकड लंपास केल्याची शंका असून गाडीतील महिला वाहकाने पूर्णपणे असहकार्य दाखविल्याने संबधित महिलेने नाराजी व्यक्त केली.

सीसीटीव्ही लावण्याची मागणी
तालुक्यातील भरवस येथील माहेरवाशीण असलेली महिला शितल पवन देवरे या शिंदखेडा जाण्यासाठी बस स्थानकावर आल्या असता अमळनेर शिंदखेडा बस क्र 8523 मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने त्यांना जोरदार धक्का देऊन त्यांच्या पर्समध्ये असलेले 16 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 7 हजार रु लांबविले हा प्रकार देवरे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या महिलेस दुरून हटकले परंतु ती महिला तोंडावर साडीचा पदर झाकून लागलीच पसार झाली,तोपर्यंत गाडी देखील सुरु झाल्याने देवरे यांनी गाडीतील महिला वाहकास बस पुन्हा स्थानकात नेण्याची विनंती केली,मात्र आमच्या कडे वेळ नाही तुम्ही येथे उतरून स्थानकावर जा आणि तपास करा असा उलट सल्ला देऊन असहकार्य दाखविले.त्यामुळे ती महिला बस स्थानकावर आली असता शोधाशोध करूनही चोरटी महिला हाती लागली नाही.याबाबत अमळनेर पोलिसात महिलेने तक्रार दिली आहे. दरम्यान लग्न सराई आणि उन्हाळी सुट्ट्यामुळे बस स्थानकावर प्रचंड गर्दी असून त्याचाच फायदा हे चोरटे घेऊन अनेकाचे दागिने आणि रकमा लंपास होत आहेत. याठिकाणी पोलीस कर्मचारी संख्या वाढवून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असूनही बाबत अद्याप पाकिटमारांवर प्रतिबंध आला नाही.