अमळनेर मतदारसंघाचा कायपालट करणार

0

आमदार शिरीष चौधरींचे आश्‍वासन

अमळनेर – गेल्या पाच वर्षात आमदारकीच्या माध्यमातुन कोट्यावधी रूपयांचा निधी आणला आहे. तालुक्यासाठी जिव्हाळ्याचा असलेल्या पाडळसरे धरणासाठी देखिल निधी मंजूर झाला आहे. येत्या पाच वर्षात अमळनेर मतदारसंघाचा कायापालट करण्याचे आश्‍वासन अमळनेर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आमदार शिरीष चौधरी यांनी दिले.
अमळनेर मतदारसंघातुन आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपातर्फे अर्ज भरल्यानंतर निघालेल्या मिरवणूकप्रसंगी मतदारांशी संवाद साधला. संत सखाराम महाराजांचे आशीर्वाद घेत निघालेल्या या मिरवणूकीत हजारोंचा जनसमुदाय दिसून आला. या मिरवणुकीत उदय वाघ व रविंद्र चौधरी यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून कार्यकर्त्यांनी नाचवले. रॅलीत हिरा उद्योग समुहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी, विधान परिषद आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार बी.एस. पाटील, माजी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, अ‍ॅड.ललिता पाटील, रेखाताई चौधरी, अनिता चौधरी ,आरपीआयचे श्याम संदानशिव पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.