अमळनेर : येथील मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांतून रस्ते विकास कार्यक्रमातर्गत मंगलमूर्ती पतपेढी ते तालुका क्रीडा संकुल रस्ता, मजबूतीकरण, रुंदीकरण, दुभाजकासह सुशोभीकरण, डांबरीकरण (1 कोटी 15 लक्ष) इत्यादी विकास कामांचे भूमिपूजन आज शनिवार 10 डिसेंबर रोजी करण्यात आले. अमळनेर मतदार संघातील गावांसाठी मंजूर झालेल्या 33.57 पैकी 4 कोटी 44 लाख 50 हजार रुपयांचे रस्ता विकास कार्यक्रमांतर्गत हिंगोणा, रुबजी नगर, मंगलमुर्ती चौक, आर.के.नगर, धानोरा फाटा, मारवड, कळमसरे अशा गावातील ग्रामीण तथा शहरी रस्ता, लहान मोठ्या पुलांचे भुमिपूजन सोहळा आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते पार पडला.
तालुक्यातील हे विविध कामांना होणार सुरूवात
ग्रामीण भागातील रस्त्यांची समस्या तथा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघेल, यात प्रामुख्याने पारोळा-बहादरपूर, अमळनेर, मारवड, निम कपिलेश्वर रस्ता प्रजिमा 49 किमीचे रस्त्याचे रुंदीकरणासह, डांबरीकरण करणे (भाग-फाफोरे ते हिंगोणा कामाची किंमत 36 लक्ष असून या दोन्ही गावांची रस्त्याची समस्या कायमची दूर होणार आहे. हिंगोणे खु.प्र.अ.या गावातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच सुधारणा होणेकामी 7.50 लक्षाचे रस्ता काँक्रीटीकरणासह गटार बांधणे, मोंढाळे, बहादरपूर, फाफोरे, अमळनेर रस्ता प्रजिमा 49 किमीचे लांबीचे मजबुजीकरण व रुंदीकरण व दुभाजकासह सुशोभिकरण करणे या कामाची किंमत 60 लक्ष आहे. यात अमळनेर शहरातील रुबजीनगर जवळ हे काम होणार आहे व अमळनेर मारवड-निम-कपिलेश्वर रस्ता प्रजिमा 49 किमीचे मजबुतीकरण व रुंदीकरण व दुभाजकासह सुशोभिकरण करणे (भाग-मंगलमुर्ती पतपेढी ते तालुका संकुल) या कामाची किंमत 45 लक्ष रुपये आहे. प्रजिमा 49 मारवड- कळमसरे-निम-कपिलेश्वर रस्ता किमीचे कळमसर रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण,दुभाजक विद्युतीकरणासह सुधारणा करणे. या कामाची किंमत 50 लक्ष, अमळनेर-मारवड-निम-कपिलेश्वर रस्ता प्रजिमा 49 किमीचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (भाग-धानोरा फाटा-मारवड) या कामाची किंमत 50 लक्ष, पारोळा-बहादरपूर-अमळनेर-मारवड-निम-कपिलेश्वर रस्ता प्रजिमा 49 किमीचे रुंदीकरण व डांबरीकरण (भाग-मारवड ते कळमसरे) करणे या कामाची किंमत 37 लक्ष, मेहेरगाव-धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन रस्ता रामा-15 किमीचे रुंदीकरणासह सुधारणा होणार आहे.
यांची होती उपस्थिती
सदरच्या रास्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. अशोक पवार, पं.स. उपसभापती उदय नंदकिशोर पाटील, श्रीराम चौधरी बांधकाम सभापती उमेश साळुंखे, दीपक चौगुले, नगरसेवक सलीम टोपी, भरत पंजाबी, योगराज संदाशिव, निखिल पाटील, दीपक साळी, नगरसेवक प्रवीण पाठक, कल्याण पाटील, नगरसेवक नरेंद्र चौधरी, नगरसेविका सविता संदानशिव, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, अविनाश जाधव, सुरेश सोनवणे, आनंदसिंग पाटील, किरण सावंत, सुनील भामरे, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक नगरसेवक, सरपंच, आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.