अमळनेर : अमळनेर शहरात नुकताच संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने यात्रोत्सवात आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावच्या विवाहितेचे मंगळसूत्र लंपास
योगीता दीपक पवार (35, रा.तुकाराम नगर, जळगाव) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 20 मे रोजी अमळनेर शहरातील संत सखाराम महाराज यात्रोत्सव पाहण्यासाठी त्या आल्या असता अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील करीत आहे.