अमळनेर येथील कुंटणखाना परीसरात पोलिसांचा छापा

0

अमळनेर । येथील कुंटनखाना परीसरात गुरूवार 13 रोजी सायंकाळी 6.30 वाजता चार घरांवर छापे टाकून 4 कुंटनखाना मालकिन, 10 महिला व 11 पुरुषांविरुद्ध पीठा एक्ट प्रमाणे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. सदरची करवाई चाळीसगाव, चोपडा, अमळनेर येथील अधिकारी, पोलिस कर्मचारी यांनी केली असून यात जमीला बाप बशीर शेख, पपीता दिलशाद शेख, मीनू शेख जमीला, रीना मेघना सहाने तसेच 10 पीडित महिला व 11 पुरुषांविरुद्ध कुंडणखाना मालकिन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पीडित महिलाना वैद्यकीय तपासणी करुन महिला सुधार गृहात पाठविण्यात येणार आहे.

अंबट शौकिनावर मुंबई पोलिस कायद्याप्रमाणे करवाई करण्यात आली. सदरची करवाई अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव व पोलिस उपअधिक्षक रफीक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिस निरीक्षक विकास वाघ, स.पो.नि कांचन काळे, सुरेश मोरे, चाळीसगाव येथील हे.कॉ. युवराज नाईक, दिलीप जाधव, नितिन अगोणे, नाना चिते, दत्तात्रय पाटील, मिलिंद भामरे, चोपडा येथील रत्नमाला शिरसाठ, मेघा राजपूत, शितल मूरकूटे, अमळनेर येथील स्मिता भालडे, नरसिंग वाघ, मेघराज वाघ, सुहास पाटील, योगेश पाटील यांनी केली.