अमळनेर । आमदार शिरीष चौधरी यांच्या नवीन इंदूमाई या निवासाचे वास्तूशांती व आमदार कार्यालयाचा शुभारंभ नुकताच करण्यात झाला. यावेळी नपाचे नगरसेवक, नगरसेविका, कृउबा समितीचे सभापती, संचालक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, व्यापारी बांधव, विविध पक्षाचे पदाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक, तहसीलदार, सर्कल अधिकारी, तलाठी, बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता, पत्रकार बांधवांसह आदी उपस्थित होते.