अमळनेर। 1 जुलैपासून लागू होणार्या जीएसटी प्रणाली विषयी व्यापारी,उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक यांना सखोल माहिती मिळावी, यासाठीमध्ये उद्योगपती विनोद पाटील, प्रवीण पाटील मित्र परिवार व सेंट्रल एक्साईज अॅण्ड कस्टमस् रेंज अमळनेरतर्फे शहरातील जी एस हायस्कुलच्या प्रांगणातील आयएमए लायन्सहॉल मध्ये चर्चासत्र घेण्यात आले. या प्रसंगी व्यापार्यांनी विचारलेल्या अनेक शंकांचे निरसनही करण्यात आले. संजय दवे, पी.एस. गायकवाड, आय.डी.घोडे, डी.सी.सैतवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार डिगंबर महाले यांनी मानले.
प्रणालीविषयी सुटसुटीत मार्गदर्शन
यावेळी धुळे येथील सहाय्यक आयुक्त संजय दवे यांनी जीएसटी प्रणालीचे उद्योजक, व्यापार्यांनी रजिस्ट्रेशन कसे करावे. कर कसा भरावा यासह जीएसटी प्रणालीचे देशातील सर्व राज्यांवरच्या जळण घडणीवर काय परिणाम होईल. सामान्य नागरिकांपासून ते व्यापारी, उद्योजकांपर्यंत ही प्रणाली कशी फायदेशीर व सुटसुटीत आहे. याविषयी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन द्वारे माहिती दिली.