अमळनेर येथे प्रताप मिल परीसरात गौरव समारोहाचे आज आयोजन

0

अमळनेर। येथील प्रताप महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य व हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉ.प्रभाकर सदाशिव पंडित यांचा त्यांचे विद्यार्थी व समकालीन कार्यकर्ते यांच्या वतीने आज 3 जून रोजी दुपारी 4 वाजता बन्सीलाल पॅलेस प्रताप मिल परिसर येथे गौरव समारोह आयोजित करण्यात आला आहे. प्रा.डॉ. पंडित यांनी अध्यापना बरोबर सामाजिक कार्य, ज्ञानेश्वरी व संत साहित्याचा अभ्यास व त्याचा वैयक्तीक आचरणातही पुरेपूर उपयोग केला आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही काही वर्षे रा स्व संघाचे प्रचारक म्हणून पूर्ण वेळ काम केले. त्यानंतर प्रताप महाविद्यालयात सेवेत असतांना अमळनेर व जिल्ह्यात इतर ठिकाणी अभाविप कामाची सुरुवात केली शहरातील विविध सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या मार्गदर्शनातून ऊर्जा घेऊन कार्यकर्त्यांची एक पीडी राज्य व देश पातळीवर सक्रिय आहे. कार्यक्रमास श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थानवाडी संस्थानाचे गादिपती हभप प.पू. प्रसाद महाराज, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांची उपस्थिती राहणार आहे