अमळनेर। येथून जवळ असलेल्या मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे ‘वृक्ष दिंडी व पर्यावरण बचाओ‘ लोक चळवळी निमित्त रॅली काढण्यात आली. भर पावसात सुमारे दोन तास चाललेल्या या रॅलीने शहरातील आतापर्यंतचे उपस्थितीचे सर्व विक्रम मोडीत काढले. या कार्यक्रमाचा शुभारंभ साने गुरूजी विद्या मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी होते. नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, हेमकांत पाटील, जयवंत पाटील, रमेश बहुगुणे, सुभाष भांडारकर, नामदेवराव पाटील, गोकुळ बोरसे, शाम संदानशिव, मनोज पाटील, पंकज मुंडदे, साहेबराव शेजवळ, तहसीलदार प्रदीप पाटील, चंद्रकांत काटे, हरचंद लांडगे आदी प्रमुख अतिथी होते.
युट्यूब चॅनेलचे लोकार्पण: जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याहस्ते मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या युट्यूब चॅनेलचे लॅपटॉपच्या सहाय्याने लोकार्पण केले. जळगाव येथील चार्टर्ड अकाउंटंट आर.के.खैरनार यांनी धर्मदाय विभागा बाबत पीएचडी मिळविल्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथीना तुळशी वृंदावन देऊन संस्थेचे पदाधिकारी एस.एन.पाटील, एस.बी.बाविस्कर, गिरीश कुलकर्णी, अनिल अहिरराव, दिलीप बहिरम यांनी स्वागत केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी चायनीज मालावर बहिष्काराची शपथ देण्यात आली.
रॅलीतील सहभागींनी घडविले शिस्तीचे दर्शन
अनेक महिला व मुली पारंपरिक वेशात आले होते. त्यांच्यात कलशधारींची संख्या लक्षणीय होती. उर्दू शाळेतील विद्यर्थिनींचा त्यांच्या पारंपरिक वेशातील खूप मोठा सहभाग कौतुकास्पद ठरला. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकांमुळे रॅलीचा रोमांच शिगेला पोहोचला होता. ट्रॅक्टर व बैलगाड्यांचे शोभारथ प्रताप हाय स्कुलची पालखीही लक्षवेधी ठरले. स्टेशन रोड मार्गे रॅली नगरपालिका, सुभाष चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजारमार्गे वाडी चौकात आल्यावर सांगता झाली. रॅली नगरपालिकेजवळ आल्यावर तेथे नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील, साहेबराव पाटील, नगरसेवक व पालिकेतील कर्मचार्यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले. तेथेही विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या तालावर जोरदार जल्लोष केला. रॅलीच्या मार्गात स्वामी नारायण मंदिर, जैन सोशल ग्रुप, लायन्स क्लब, अनमोल ग्रुप, पी.सी.सी.ग्रुप, विनोद वर्मा यांच्यातर्फे पाणी, सरबत, बिस्कीट, गोळ्या, चॉकलेट, लाडू आदी खाऊ वाटप करण्यात आले. रॅलीतील सहभागी सर्वांनीच उत्कृष्ट शिस्त व नियोजनाचे दर्शन
हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरूवात
आमदार शिरीष चौधरी, सुनीता कुलकर्णी, यु.एम.शाह, जयश्री साबे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ दिला. रॅलीत साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, साने गुरुजी कन्या विद्यालय, जी.एस. हायस्कुल, डी.आर.कन्याशाळा, प्रताप हायस्कुल, प्रताप महाविद्यालय,पी.एन. मुंदडा हायस्कुल,लोकमान्य विद्यालय,जय योगेश्वर हायस्कुल, पी.बी.ए.इंग्लिश मेडिअम स्कुल, सेंट मेरी स्कुल, नॅशनल उर्दू स्कुल,अल्फाइज गर्ल्स हायस्कुल, ममता विद्यालय, शिवाजी हायस्कुल, संत सखाराम माउली वेद पाठशाळा, संत सखाराम माउली वारकरी पाठशाळा, न्यू व्हिजन इंग्लिश मेडिअम स्कुल, स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडिअम स्कुल, ग्लोबल स्कुल, ललिता पाटील इंग्लिश मेडिअम स्कुल, गुजराथी महिला मंडळ, वृक्षवल्ली महिला फाउंडेशन, लायनेस क्लब तालुक्यातील तासखेडे, अंतुर्ली व नांदगाव येथील हरीभक्त पारायण भजनी मंडळाचे सदस्य, विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.