अमळनेर येथे मध्यरात्री प्रवाश्याला रेल्वेतून फेकले

0

अमळनेर- येथून १५ किलो मीटर अंतरावरील पाडसे रेल्वे स्टेशन जवळ प्रवासी अजय वासुदेव देवकर (२७) रा.वडणेर गंगाई ता.दर्यापूर जिल्हा अमरावती हा प्रवासी अजमेर-पुरी एक्सप्रेसने अकोल्याहून कामासाठी सुरत येथे जात असतांना रात्री ११.४५ ते १२.३० दरम्यान पाडसे नजीक अज्ञात व्यक्तींनी प्रवासी कडील बॅग, मोबाईल, पाकिटातील १३०० रुपये रोख हिसकावून रेल्वे खाली फेकले. सुदैवाने यात अजय देवकर बचावला असून तो जखमी झाला आहे.

बेशुद्ध अवस्थेत असतांना रात्री २ च्या सुमारास रेल्वे ट्रॅकमेनच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ १०८ क्रमांकाची गाडी बोलावून त्याला अमळनेर ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाने प्रवाशाच्या नातेवाईकाला कळविले आले. ही बाब मारवड पोलीस व रेल्वे पोलिसांना कळविण्यात आली मात्र पोलिस रुग्णालयात फिरकलेच नाही. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे प्रवासी सुरक्षित नाही असे जखमी अजय देवकर यांनी दैनिक जनशक्तीशी बोलतांना सांगितले.